महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यामध्ये ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स बाबत प्रशिक्षण सत्र


विदर्भ न्युज एक्सप्रेस 

प्रतिनिधी भंडारा : १२ जानेवारी ला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध लघु उद्योजक, बचत गटांमार्फत व्यवसाय करणाऱ्या महिला, शेतकरी उत्पादक गट इत्यादींसाठी ऑनलाईन मार्केटिंग मधील संधी वाढविण्याच्या अनुषंगाने ओ.एन.डी.सी बाबत एक ऑनलाईन सत्र नुकतेच आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी ओ.एन.डी.सी चे रिजनल मॅनेजर धीरज कुमार यांनी जिल्ह्यातील १०० उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले उत्पादन ऑनलाईन माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करावे व त्याद्वारे उत्पन्नामध्ये वाढ करावी तसेच ओ.एन.डी.सी हा प्रकल्प शासनाच्याच माध्यमातून राबविला जात असल्याने त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याप्रसंगी केले. मुख्यमंत्री फेलो निलेश साळुंके यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

काय आहे ओ.एन.डी.सी -

ओपन नेटवर्क फॉर डिजीटल कॉमर्स ओ.एन.डी.सी ही कंपनी भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग डी.पी.आय.आय.टी ने ओपन.ई कॉमर्स  विकसित करण्यासाठी स्थापन केली आहे. ज्या पद्धतीने ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना यु.पी.आय च्या माध्यमातून गुगल पे ला लिंक असलेल्या एका बँक च्या अकाउंट मधून वापरकर्ता समोरील व्यक्तीच्या फोनेपे ला लिंक असलेल्या दुसऱ्या बँक च्या अकाउंट ला पैसे पाठवू शकतो.

त्याचप्रमाणे ओ.एन.डी.सी च्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्म वर विक्री साठी ठेवलेली वस्तू ग्राहक इतर प्लॅटफॉर्म वरूनही खरेदी करू शकतात. यामुळे विक्रेत्यांच्या वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात व ग्राहकाला खरेदी साठी अनेक विकल्प उपलब्ध होतात. या अनुषंगाने ओ.एन.डी.सी हि प्रणाली जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांना ऑनलाईन मार्केटिंग साठी फायदेशीर ठरू शकते.

असा घ्यावा फायदा : जिल्ह्यातील ज्या विक्रेत्यांना आपली उत्पादने ओ.एन.डी.सी च्या माध्यमातून ऑनलाइन विक्री साठी उपलब्ध करावयाची असतील अथवा ओ.एन.डी.सी बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी पुढे दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून एक गूगल फॉर्म भरावा. सदर फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ओ.एन.डी.सी तर्फे संपर्क साधला जाईल व सर्व प्रकारची मदत केली जाईल. 





  Print






News - Bhandara




Related Photos