राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालयात स्व. रमेश गाडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली


- शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या आठवणी; दिवंगत आत्म्यास विनम्र अभिवादन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : येथील राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालयात स्व. रमेश बा. गाडगे यांच्या निधनानिमित्त शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी स्व. गाडगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास निखाडे, प्रा. डॉ. संतोष डाखरे, प्रा. मोराडे, प्रा. डॉ. प्रमोद घोनमोडे तसेच सुनील ताजने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. रमेश गाडगे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाचा, सामाजिक बांधिलकीचा तसेच समाजासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. स्व. गाडगे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
स्व. रमेश गाडगे यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना असून, त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेला महाविद्यालयातील इतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




