महत्वाच्या बातम्या

 आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे आकस्मिक भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांनी बोधली येथिल सरपंच आकाश निकोडे यांच्या आई शांताबाई निकोडे यांना ब्लड कँसर आजाराने ग्रस्त असून त्यांच्या आजाराविषयी माहिती जाणून घेतली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णासोबत आस्थेने विचारपूस केली.

यावेळी सिविल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते  यांच्या सोबत रुग्णांची गैर सोय होऊ नये, याबाबत सूचना दिल्या आणि रुग्णालयातील सोयी सुविधा बाबत माहिती जाणून घेतली. 

याप्रसंगी प्रकाश कुकुडकर माजी जि.प. सदस्य, हेमंत बोरकुटे कृ.उ. बाजार समिती संचालक, राजू खांगर उपसरपंच मुरखळा (नवेगाव) सचिन येणप्रेड्डीवार भाजपा युवा नेते तथा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos