भंडारा शहरातील पथ विक्रेता, फेरीवाल्यांचे मोबाईल अँप संगणक प्रणाली द्वारे बायोमेट्रिक सर्वेक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
केंद्र शासन व राज्य शासनाच्या धोरणानुसार दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान
(Day-Nulm) नगर परिषद भंडारा अंतर्गत सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व (इंडिया) प्रा. ली. नागपूर या बाह्य संस्थेमार्फत भंडारा नगर परिषद कार्यक्षेत्रात व्यवसाय करणार्‍या परवानाधारक, विनापरवानाधारक पथ विक्रेता, फेरीवाल्यांचे मोबाईल अँपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. पथविक्रेत्यांचे आधार कार्ड व सध्या वापरात असणारा भ्रमनध्वनी (मोबाईल) क्रमांक आधार कार्डशी सलग्नअसणे आवश्यक आहे. पथविक्रेता हा भारतीय नागरीक असावा. पथविक्रेत्यांकडे महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, पँन कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, अनुसूचीत जाती – जमाती मध्ये समावेश असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, विधवा/ परितक्त्या/ एकल महिला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र, इत्यादी कागद पत्राच्या झेरोक्स प्रती मोबाईल अँपद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वेक्षनाच्यावेळी पथविक्रेत्यांने जवळ तयार ठेवावे.
पथविक्रेत्यांचे वय १४ वर्षापेक्षा कमी असू नये, तसेच कुटुंबातील एकाच व्यक्तीची पथविक्रेता म्हणून नोंदणी करण्यात येईल. सर्वेक्षण करताना सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व (इंडिया) प्रा. ली. संस्थेमार्फत भंडारा शहरातील पथ विक्रेत्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने मोबाइल वर आलेल्या OTP द्वारे मोबाइल अँप व संगणक प्रणाली चे माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक वरील कागदपत्र सर्वेक्षण करतेवेळी सर्वेयर यांना उपलब्ध करून द्यावे.
सदर कागदपत्र उपलब्ध नसल्यास त्यांना त्या कागदपत्राची पूर्तता सर्वेक्षण झाल्यावर ३ दिवसाच्या आत शहर अभियान व्यवस्थान कक्ष नगर परिषद भंडारा कार्यालय येथे जमा करणे आवश्यक आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतरच पथ विक्रेत्यांची प्राथमिक स्वरुपात नोंदणी होईल व तसा संदेश (SMS) पथ विक्रेत्यांच्या भ्रमणध्वनिवर (मोबाईलवर) मिळेल. सदर सर्वेक्षनात नोंद झालेल्या पथ विक्रेत्यास विक्री प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार आहे. नगर परिषदेने शहर फेरीवाला सहाय्यता केंद्र स्थापन केले आहे. शहरात सॉफ्टसेन्स टेक्नोसर्व (इंडिया) प्रा. ली. नागपूर यांच्या वतीने सर्वेयर भूषण हरडे, दिनेश रूपचंद मोटघरे, काशिफ आरिफ शेख हे सर्वेक्षण करणार असून नगर परिषद अधिकारी अश्विनी चव्हाण, संगणक अभियंता नागेश कपाटे, अभियान व्यवस्थापक प्रवीण पडोळे हे सर्वेक्षनाचे काम पाहणार आहे. संबंधित सर्वेक्षण कागदपत्रे संगणक प्रणालीवर अपलोड करण्यासाठी हरिपाल ठाकरे, कलाम शेख
यांची नियुक्ती केली असून पथ विक्रेता, फेरीवाला व्यावसायीकांनी आपले सर्वेक्षण पूर्ण होताच संबंधित कागदपत्रे सर्वेक्षकास किंवा नगरपालिकेतील सहाय्यता कक्ष येथे जमा करावीत अशी माहिती अध्यक्ष शहर फेरीवाला समिति तथा मुख्याधिकारी यांनी दिली. शहरातील पथ विक्रेता, फेरीवाला यांनी आपले मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून सर्वेक्षना करिता आलेल्या सर्वेक्षकास आवश्यक माहिती व कागदपत्र उपलब्ध करून द्यावे व आपले सर्वेक्षण करून घ्यावे. असे आवाहन नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी केले आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-08-13


Related Photos