झी मराठी तर्फे भामरागडच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
भामरागड सारख्या अतिदुर्गम भागात शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल झी मराठी या वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित उंच माझा झोका या  सत्कार समारंभात गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे यांचा गौरव करण्यात आला.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याहस्ते गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, मान्यवर, विविध क्षेत्रातून पुरस्कार पटकाविलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भामरागड सारख्या दुर्गम तालुक्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणण्यात सोनवाणे यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात यावे यासाठी स्वतः दुर्गम गावात जावून विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांशी संवाद साधणे, मुलांची निवासी व्यवस्था करणे तसेच इतर आमुलाग्र बदल घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहीला आहे. या कार्याची दखल घेत झी मराठी तर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-12


Related Photos