महत्वाच्या बातम्या

 भामरागड येथे सिकलसेल जनजागृती रॅली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील सांज मल्टी ॲक्टीव्हिटी या सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भामरागड येथे सिकलसेल जनजागृती रॅली काढून उपस्थित युवक-युवतींना सिकलसेल या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सांज मल्टी ॲक्टीव्हिटी डेव्हलपमेंट इंस्टिट्युट यस्टर एरिया, बिनागुंडा, स्थित भामरागड या स्वयंसेवी संस्थेमार्फत नुकतेच सिकलसेल जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात संस्थेच्या कार्यालयापासून करण्यात आली. चला जाऊया सिकलसेल तपासणीला, लग्नाआधी सिकलसेलची तपासणी करा. अशा घोषणा देत रॅली भामरागडचा मुख्य चौक व रस्त्यांवरुन निघाली. त्यानंतर क्रांतिवीर बिरसा मुंडा वाचनालयाचे आवारात रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना सिकलसेल या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सिकलसेल एस.एस. हा जीवघेणा आजार असून अनुवंशिक आहे. त्यामुळे प्रत्येक युवक-युवतींनी लग्नाआधी सिकलसेल आजाराची तपासणी करून घ्यावी, असे यावेळी सांगण्यात आले.

जनजागृती रॅलीत आदिवासी वस्तीगृह येथील मुला-मुलींनी तसेच भामरागड येथील युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. रॅलीचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक कुमार रुपलाल मारोती गोंगले यांनी केले. रॅलीच्या यशस्वीतेसाठी पुष्पा होयामी, राकेश वड्डे, मनोज मज्जी, लक्ष्मन ओक्सा, बलदेव पुंगाटी, प्रकाश वड्डे यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos