महत्वाच्या बातम्या

 मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : देवळी तहसिल कार्यालयात मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रात्याक्षिक कक्षाद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे कार्य कशा पध्दतीने चालते याचे प्रात्यक्षिकाद्वारे मतदारांना मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी प्रात्यक्षिक कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रात्याक्षिक कक्षाला भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीला ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. या संदर्भात प्रचार प्रसिध्दी ही तीन पातळीवर करण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची जनजागृती संबंधातील नाविन्यपूर्ण क्रिएटिव्ह कंटेट स्थानिक भाषेमध्ये तयार करुन तो प्रसिध्द करण्यात येणार आहे. यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रात्यक्षिक केंद्रामध्ये जनतेला ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे कार्य कशा प्रकारे चालते हे प्रत्यक्ष पाहता येणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने देवळी विधानसभा क्षेत्रात ही जनजागृती मोहिम राबविली जात आहे.

सदर मोहिम जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार दत्तात्रय जाधव यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे, असे देवळीच्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos