पुरामुळे भामरागडवासीयांचे हाल, बाजारपेठ बंद, भाजीपाला महागला


- पुराचे पाणी शिरले घरे, दुकानांत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्याला मागील २९ जुलैपासून तब्बल चौथ्यांदा पुराचा फटका असला आहे. आज सकाळपासूनच पर्लकोटा नदीवरील पुल बंद झाल्याने तालुक्यातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे. तर पुरामुळे भामरागड वासीयांचे चांगलेच हाल होत आहेत. मागील दहा दिवसांपासून अनेक दुकाने बंद आहेत. आज बुधवार असल्याने बाजारपेठही बंद ठेवावी लागली. भाजीपाला पोहचला नाही. यामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. 
आजही अनेक घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच पाण्याची पातळी वाढतच आहे. पावसाची रिपरिपही सुरूच आहे. यामुळे भामरागडवासीयांना आखणी त्रास सहन करावा लागणार आहे. सतत तीन आठवडी बाजार भरले नाहीत. यामुळे भाजीपाला सुध्दा खरेदी करता आला नाही. दररोज भरणारा गुजरी बाजारसुध्दा भरत नसल्यामुळे नागरीकांना जीवनावश्यक साहित्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. सध्या भामरागडमध्ये जिकडे - तिकडे पाणीच पाणी आहे. पोलिस व महसूल विभाग पुरपरिस्थतीवर नजर ठेवून आहेत. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिल्यामुळे नागरीकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-07


Related Photos