महत्वाच्या बातम्या

 ग्रीनवूडमध्ये रंगला बाळ गोपाळांचा दांडिया


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रीन गुड फ्री स्कूल गडचिरोली येथे नवरात्रीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी दांडिया आयोजित करण्यात आला .

लहानपणापासूनच बालकांना आपल्या संस्कृतीची आणि विविधतेची ओळख व्हावी म्हणून ग्रीनवूड प्री स्कूल येथे विविध सण साजरे करण्यात येतात. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. शाळेच्या सांस्कृतिक प्रमुख शुभांगी पांडे यांनी विद्यार्थ्यांना आठवडाभर दांडिया गरबा नृत्यांचे प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला युकेजी च्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा म्हणून शिक्षकांनी सुद्धा एक सामूहिक नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मानद वन्यजीव संरक्षक मिलिंद उंबरे होते तर अतिथी म्हणून आर्ट ऑफ लिविंग च्या अंजली कुळमेथे, कला प्रशिक्षक अनिल बारसागडे व प्राचार्य सौ संगीता अतकमवार उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ सारिका घोटेकर घोटेकर व मनीषा कोलुरवार यांनी केले.आणि आभार प्रदर्शन प्रतीक्षा वाघमारे यांनी केले. .





  Print






News - Gadchiroli




Related Photos