३०० रूपयांच्या हिशेबासाठी पतीने चिमुकलीसमोर केली पत्नीची हत्या


वृत्तसंस्था / बीड :  फक्त ३०० रूपयांच्या हिशेबांसाठी पतीने चिमुकलीसमोर पत्नीची हत्या केल्याची घटना जिल्ह्यातील  अंबेजोगाई तालुक्यातील सातेफळ शिवारात  घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अशोक आणि दिपाली असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. वीट भट्टीवर काम करणाऱ्या या दाम्पत्यात ३०० रूपयांच्या हिशेबावरून मंगळवारी रात्री वाद झाला. त्यानंतर अशोक गुलाब नरसिंगे याने पाच महिन्यांच्या चिमुरडीसमोरच पत्नी दिपालीला विटांनी ठेचून मारले.  प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, १५ दिवसांपूर्वी अशोकने बाजार करण्यासाठी दिपालीला तीनशे रुपये दिले होते. त्याचा हिशेब अशोकने पत्नीकडे मागितला. त्यामध्ये दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. पाच महिन्याच्या आपल्या लेकीसमोरच अशोकने पत्नी दिपालीचा खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर परराज्यात पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या अशोकला पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून अटक केली. 
  Print


News - Rajy | Posted : 2019-08-01


Related Photos