प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
शासनाने खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत  २४ जुलै अशी होती.  २४  जुलै  च्या  शासन निर्णयानुसार योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदत वाढवून ती  २९ जुलै,  अशी करण्यात आली होती.  मात्र शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम  २०१९ मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी ३१  जुलै, पर्यंत पुन:श्च मुदतवाढ देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.   
 योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.  अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन  कृषिमंत्री ना. डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-29


Related Photos