शाळेत विद्यार्थिनींना दाखविली मोबाईलवर अश्लिल चित्रफित , ‘पोक्सो’ कायद्यान्वये शिक्षकाला अटक


-  जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बालहक्क आयोगाने घेतली  तक्रारींची गंभीर दखल  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली
: विद्यार्थिनींना  शाळेत  मोबाईलवर अश्लिल चित्रफित दाखवून विनयभंग केल्याच्या तक्रारीवरून कुरखेडा पंचायत समितींतर्गत जिल्हा परिषद शाळेत कार्यरत एका   प्राथमिक शिक्षकास ‘पोक्सो’ कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे.  श्रीकांत महादेव कुथे असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. नुकतेच  गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या बालहक्क आयोगा समोर या प्रकरणाची तक्रार करण्यात आल्यानंतर समितीच्या निर्देशानुसार शिक्षक कुथे याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 
मागील शैक्षणिक सत्रात वर्गात शिकविताना विद्यार्थिनींना मोबाईलवर अश्लील चित्रफित दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. बालहक्क आयोगाने या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. पुराडा पोलिस ठाण्यात श्रीकांत कुथे याच्यावर बाल लैगिंक अत्याचार कायदा कलम १२,अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा(३)(२)(५),भादंवि ३५४(अ),५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. काल २६ जून रोजी  जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी संपल्यानंतर आज २७ जुलै रोजी  त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  उपविभागीय पोलिस अधिकारी गायकवाड प्रकरणाचा तपास करीत आहेत. श्रीकांत कुथे हा एका शिक्षक संघटनेचा जिल्हा सरचिटणीस आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-27


Related Photos