महत्वाच्या बातम्या

 धान उत्पादकांच्या मदतीसाठी पालकमंत्री थेट बांधावर


- जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आज विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. गावित यांनी तातडीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या शेतीच्या विशेषत धान पिक नुकसानीची पाहणी केली.

जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. या नुकसानाची पाहणी आज  केली. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी राज्यमंत्री परिणय फुके, यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी दुपारच्या सुमारास  भंडारा तालुक्यातील चिखली येथील वैभव आकरे यांच्या  शेतातील नुकसान पाहणी केली. मोहाडी तालुक्यातील सातोना या गावांच्या शिवारात भेट दिली. यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन धानपिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी पीक नुकसानीच्या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या. विमा कंपनीला तातडीने याबाबतचा अहवाल द्यायच्या सूचना त्यांनी केल्यात.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे गावित यांनी शेतकऱ्यांना आश्र्वस्त केले. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, महसूल, पणन व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos