महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे संत श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीनिमित्य शासकीय कार्यक्रम संपन्न 


- खासदार रामदासजी तडस यांची प्रमुख उपस्थिती

- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य सर्वांसाठी दिशादर्शक, खासदार रामदासजी तडस यांचे प्रतिपादन.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य संपुर्ण समाजाला दिशादर्शक स्वरुपाचे होते, त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेमध्ये आपल्या लेखणीतुन आपल्याला अमुल्य असा ठेवा उपलब्ध करुन दिला आहे. त्यांचे कार्य आजही आम्हाला दैनदिन जिवणात चांगल कार्य करण्याचे उर्जा निर्माण करुण देते, अशा या थोर संताला जयंती दिनानिमीत्य विनम्र अभिवादन करतो, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

आज नवि दिल्ली येथे महाराष्ट्र शासनाच्या निवासी आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र सदन संत श्री. संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम आयोजीत केला होता, त्या कार्यक्रमात खासदार तडस बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे निवासी आयुक्त महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - World




Related Photos