महत्वाच्या बातम्या

 वेकोलिच्या खाणीत वाघांचा वाढला धोका : कामगारांना जीव धोक्यात घालून करावी लागत आहे काम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी खाणीत वाघांचा धोका वाढला आहे. गेल्या आठवडाभरापासून कामगारांना सातत्याने वाघांचे दर्शन होत असल्याने रात्र पाळी मध्ये कामासाठी येताना कामगार घाबरलेले दिसत आहेत. 

५ डिसेंबर  मंगळवारी रोजी गोवरी वसाहतच्या मागे व  सस्ती खाणीतील १७ आणि २४ क्रमांकाच्या कोळसा साठा आणि काटा गेट परिसरात वाघांचा संचार दिसत आहे. तसेच सोमवारी गुप्ता कोलवॉशरी आवारात वाघ फिरत असल्याचा व्हिडिओ लोकांनी बनवला आहे. 

या परिसरात दोन वाघ व दोन शावक कामगारांनी बघतीले आहे. या परिसरातून भारी संख्यात ट्रक चे आवागमन असते. ट्रक चालक बेधडक वाहन चालवताना दिसतात. जर एखादी वाघ रस्ता ओलांडताना ट्रकच्या धडकेत ठार होण्याची शक्यता कामगारांनी वर्तीले आहे. काल एका व्हिडिओ मध्ये १०० मीटर वरून व्हिडिओ काढल्याचे म्हंटले जात आहे. या परिसरात जंगली डुकराचे कळप सुध्दा कामगारांनी बघितले. खान परिसरात झुडपी काटेरी जंगल वाढल्यामुळे प्राण्याचं संचार वाढले आहे. 

वनविभागाने पिंजरे लावून वाघांना पकडण्याची मागणी कामगार करीत आहेत. आता पर्यंत या वाघाने कोणत्याही कामगाराला इजा केली नाही. मात्र वेकोलिच्या खाणीतून कोळसा, भंगार, डिझेलची चोरी अचानक थांबली आहे. अशा स्थितीत वेकोलि व्यवस्थापनाने दोन ते चार वाघ ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. प्रत्येक खाणीत, जेणेकरून चोरीवर नियंत्रण ठेवता येईल, अशा दबक्या आवाजात कामगारांमध्ये चर्चा होताना दिसत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos