खात्यातून रक्कम गहाळ करणाऱ्या महिलेस ३ वर्षांचा कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
एटीएम कार्ड मिळविण्याच्या बनावट अर्जावर स्वाक्षरी घेऊन फिर्यादीच्या बँकेतून रक्कम गहाळ करणाऱ्या आरोपी  महिलेस स्थानीक मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने ३ वर्षांचा  साधा कारावास व ८ हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
रोशनी अशोक लेमाडे,(२४) रा. देगांव, ता. रिसोड, जि. वाशिम ह.मु.गडचिरोली  असे आरोपी महिलेचे नांव आहे.  प्राप्त माहितीनुसार   फिर्यादी भारती धर्मदास गायकवाड, रा. कॅम्प एरिया, गडचिरोली हिच्या गडचिरोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या  खात्यामधुन फिर्यादीला कुठलीही माहिती न देता लबाडीने एटीएम कार्ड मिळविण्याच्या फॉर्मवर सही घेतली. फिर्यादीची बनावट सही करुन बँकेतुन एटीएम कार्ड प्राप्त करुन त्याद्वारे  ६ हजार ६०० परस्पर काढुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केली. या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले.   आज २३ जुलै २०१९ रोजी न्यायालयाने विविध कलमान्वये आरोपीस तीन वर्षांचा  साधा कारावास व ८ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-23


Related Photos