महत्वाच्या बातम्या

 काशीनगर येथील तथागत अभ्यासिकेत स्मृती पर्वाचे आयोजन


- बार्टी उपकेंद्र नागपूरचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे तर महात्मा ज्योतीबा फुले हे शिक्षण ही स्त्री आणि पुरुषाची प्राथमिक गरज मानायचे. २८ नोव्हेंबर महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृती दिवस तर ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या दोन्हीचे औचित्य साधून बार्टी उपकेंद्राने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर मधल्या काळात या महामानवाच्या स्मृती पित्यर्थ स्मृती पर्वाचे आयोजन केले आहे.

या स्मृतिपर्वांचे उद्घाटन मंगळवारी हिंगणा येथील एमसीईडी कार्यालयात एमसीईडीचे केंद्रप्रमुख हेमंत वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. हे स्मृती पर्व ६ डिसेंबर पर्यंत चालणार असून याची सांगता चिचोली येथील शांतिवनात होणार आहे. दरम्यान नागपुरातील शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, वस्ती, विहार, ज्येष्ठ नागरिक मंडळ या ठिकाणी प्रबोधन कार्यशाळा, शासकीय योजनांची कार्यशाळा; रोजगार मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. ६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी चिचोली शांतिवन येथे आदरांजलीच्या कार्यक्रमाने स्मृतिपर्वाची सांगता होणार आहे. या स्मृतिपर्वा अंतर्गत आयोजित कार्यक्रमांत विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येंनी सहभागी होण्याचे आवाहन बार्टी उपकेंद्रामार्फत करण्यात आले आहे.

३० नोव्हेंबर रोजी रामेश्वरी काशीनगर येथील तथागत फाऊंडेशन व बार्टी उपकेंद्राच्या वतीने तथागत अभ्यासिकेत स्मृती पर्वाचे आयोजन केल्या गेले. स्मृती पर्वा अंतर्गत समाज कल्याण विभागा मार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, बार्टीच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना बार्टीच्या योजनांचे माहितीपत्रक वाटण्यात आले. बार्टीच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणसंदर्भातील प्रश्नांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश वाहूरवाघ तर सुत्र संचलन शीत गडलिंग यांनी केले.

यावेळी विचार मंचावर प्रामुख्याने तथागत फाऊंडेशनचे सचिव सुधाकर स्थूल, बार्टी उपकेंद्राचे सहप्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, सुनीता झाडे उपस्थित होते.





  Print






News - Nagpur




Related Photos