महत्वाच्या बातम्या

 अनिल शेंडे यांच्या गीतांचे पुण्यात उमटले सूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : प्रसिद्ध कवी अनिल शेंडे यांनी लिहिलेल्या भावगीतांचा शब्द नवे, सूर नवे हा एक आगळावेगळा कार्यक्रम नुकताच पुण्यातील कोथरूड येथे त्रिदल सभागृहात जॅमिंग फॉर द जॉय या संस्थेतर्फे झाला. अध्यक्षस्थानी प्रा. विठ्ठल डंभारे, तर प्रमुख अतिथी भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाखान यांचे पट्टशिष्य, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनईवादक पंडित शैलेशजी भागवत होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्वच गाणी अगदी नवीन असूनही त्यातील प्रत्येक गीताला श्रोत्यांचा दमदार प्रतिसाद मिळाला. प्रतीक भस्मे, विपुल डंभारे, समीर अनगळ, माधुरी सुतार, रेणू कुरळकर या स्थानिक गायकांनी ही गाणी सादर केली. परमप्रतापी अतितेजस्वी विरांच्या देशा हे नवे रोमांचित करणारे महाराष्ट्र गीत या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. तबल्याची संगत सर्वेश रिसबूड आणि की बोर्डची चिन्मय कारेकर यांनी केली. प्रा. डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.





  Print






News - Nagpur




Related Photos