महत्वाच्या बातम्या

 नागपूर शहर व जिल्हा अंमलीपदार्थ मुक्त करा : मुम्मका सुदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अमली पदार्थांच्या वापरावर आळा घालण्यासाठी प्रभावीपणे कार्यवाई करुन नागपूर शहर व जिल्हा अमली पदार्थ मुक्त करा, अशा सूचना पोलीस उप आयुक्त मुम्मका सुदर्शन यांनी दिल्या.

पोलीस भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीचे बैठकीत ते बोलत होते.  अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, नागपूर ग्रामिणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गाप्रसाद पारडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासनाच्या श्रीमती शहनाज ताजी, लोहमार्गपोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, कृषी अधिकारी मार्कड व्ही. खंडाईत, सहाय्यक वनसंरक्षक दिपक बागडे, जे.एच. पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी उप अधिक्षक, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अमित डोळस उपस्थित होते.

शहरामध्ये अमली पदार्थाची विक्री बंद करण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेले   पोलीस ठाण्यात  ऑक्टोबर २०२२ मध्ये नार्को इंटलिजेंस सेलची स्थापना करण्यात आली असून, एन.डी.पी.एस सेल व नार्को इंटलिजेंस सेल यांनी ३० ऑक्टोबरपर्यंत अमली पदार्थ विकणारे व सेवन करणारे असे २हजार ६७३ आरोपी चेक केले आहेत. तसेच शाळा, कॉलेज परिसरात १०० यार्डचे आत असेलेले पानठेले ज्यामध्ये गुटखा, पान, सिंगारेट, विकी करणारे व्यक्तींवर कोटपा कायदा अन्वये एकुण १हजार ८८६ केसेस करण्यात आल्या असून २३८ पानठेले बंद करण्यात आले आहे. वारंवार अशा अमली पदार्थाची विकी करणारे व त्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींची माहिती  काढून त्यांचेवर कारवाई करण्यात आली असून, माहे जानेवारी २०२२ ते ३० आक्टोबर २०२३ पावेतो एन.डी.पी.एस. कायदा अन्वये नागपूर शहरात एकूण ६४८ केसेस करण्यात आल्या आहेत, असे पोलीस उप आयुक्तांनी सांगितले.

नागपूर शहरातील अंमली पदार्थ विरोधी कारवाईचा नियमित आढावा घेतांना नागपूर शहरात अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अन्न व औषधी विभाग, कामगार विभाग व एल.सी.बी. नागपूर ग्रामिण यांची एक चमु नेमून रासायनीक कारखान्यांची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना त्यांनी पोलीस निरीक्षकांना दिल्या.
नागपूर शहरात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घ्या. शहरात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही, यासाठी कृषी, महसूल विभाग व पोलीस विभाग यांनी लक्ष दयावे. त्यामध्ये नागपूर शहरात ज्यावेळी पिकाच्या लागवडीची पिक पाहणी कृषी सहायक व तलाठी यांच्या कडून करतेवेळी प्रत्यक्ष शेतात जावून शासकीय अधिकाऱ्यांनी पिकाची पाहणी करून नोंदी घ्याव्यात. त्याबाबत कृषी व महसुल विभागांनी संबधीतांना लेखी आदेश जारी करावे. पोलीस उपायुक्त कार्यालयाशी संपर्क करून माहिती देण्यात यावी. तसेच पोलीस विभागाकडुन देखील गोपनीय माहीती काढून अशा प्रकारे खसखस, गांजा याची अवैद्य लागवड झाल्याची माहीती घेवून मिळून आल्यास त्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले.

छत्तीसगड, ओरीसा, मार्गे नागपूर शहरात येणाऱ्या रेल्वेव्दारे मोठया प्रमाणात अमली पदार्थ विशेषतः गांजा याची देवाण-घेवाण होत असून, रेल्वे स्टेशन कामठी नंतर मेन रेल्वे स्टेशन या दरम्यान रेल्वे मंदगतीने झाल्यानंतर अंमली पदार्थ गाडीतून खाली फेकून देण्यात येतो. याबाबत बारकाईने माहीती घेवून कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक लोहमार्ग यांना सूचना दिल्या. तसेच विशेषतः समता एक्सप्रेस या गाडीवरती लक्ष केंद्रीत करुन कारवाई करण्याचे आदेशित केले.

डार्कनेट व कुरिअरच्या माध्यमातून अमली पदार्थाची मागणी व पुरवठा होणार नाही याबाबत लक्ष ठेवणे. डार्कनेटबाबत सायबर पोलीसांनी अमली पदार्थाची देवान घेवान होते किंवा कसे? यावर लक्ष ठेवावे. नागपूर शहरातील व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तीची संख्या व त्यांना कोणत्या अंमली पदार्थाचे व्यसन आहे याबाबत माहिती प्राप्त करावी, असे त्यांनी सांगितले.      





  Print






News - Nagpur




Related Photos