महत्वाच्या बातम्या

 सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा पाळावी : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे विधान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : ज्याप्रमाणे संसद सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय देऊ शकत नाही तसेच सर्वोच्च न्यायालयही आमच्यासाठी कायदा बनवू शकत नाही, तो आमचा अधिकार आहे, असे नमूद करतानाच संस्थात्मक मर्यादा पाळल्या जाव्यात, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड यांनी रविवारी येथे केले.

जेव्हा राज्यातील प्रशासन, न्यायपालिका आणि विधिमंडळ सामंजस्याने, आणि एकजुटीने काम करतात तेव्हा लोकशाहीचे उत्तम पालनपोषण होते. याचसाठी कार्यकारी, न्यायपालिका आणि कायदेमंडळाने संघर्षात्मक भूमिका न घेता सहकार्याचे वातावरण निर्माण केले पाहिजे. जर काही मतभेद असतील तर ते सार्वजनिक चव्हाटय़ावर न आणता सौहार्दपूर्ण मार्गाने सोडवले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. कायदा आणि न्याय खात्याने आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

कायदे आणि घटनेचा अर्थ लावण्याचे अधिकार सुप्रिम कोर्टाला देणाऱ्या घटनेतील तरतुदी हा एक छोटासा भाग आहे, त्याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जाऊ शकत नाही. संस्थात्मक मर्यादा, सीमारेषांचा आदर व्हायलाच हवा, असे आवाहनही त्यांनी केले. संविधानाचा अर्थ लावणे हे सर्वस्वी संसदेच्या अखत्यारीत असून, केवळ संसदच घटनेची शिल्पकार आहे, असे ते म्हणाले. संसदेच्या अधिकारक्षेत्रातील ढवळाढवळ ही घटनात्मक चूक ठरेल आणि लोकशाही मूल्यांसाठी ते तत्वविरोधी ठरेल, असेही धनखड यावेळी म्हणाले.

महात्मा गांधी हे गेल्या शतकाचे महापुरुष होते तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या शतकातील युगपुरुष आहेत, अशी तुलना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केली आहे. गांधींनी आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले आणि हिंदुस्थान जिथे असायला हवा होता त्या मार्गावर आपले सर्वात यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला नेले आहे, असे त्यांनी, मुंबईत आयोजित जैन धर्मगुरू श्रीमद राजचंद्रजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सांगितले.





  Print






News - World




Related Photos