महत्वाच्या बातम्या

 शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांची एटापल्ली तालुक्यातील गट्टा केंद्रांतर्गत दुर्गम शाळेला भेट


- एटापल्ली तालुक्यांतील अतिदुर्गम गट्टा केंद्रातील शाळेला भेट.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : शैक्षणिक सत्राच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांची एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या गट्टा केंद्रातील वाळवी, जाजावंडी आणि गट्टा केंद्र शाळेला भेटी देऊन गुणवत्तेची पाहणी करत शिक्षकांसह विद्यार्थ्याना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

अतिशय नियोजपूर्वक सदर शाळेला भेटी देऊन शालेय पूर्ण वेळ विद्यार्थ्यां- शिक्षकांसोबत घालविला. सुरुवातीला केंद्र शाळेला भेटी देऊन नंतर जिल्ह्यातील गुणवत्ता पूर्ण वाळवी. या प्राथमिक शाळा गाठण्यासाठी पायपीट करीत दुचाकीच्या मदतीने गाठून शाळेत चाललेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची अनुभूती विद्यार्थ्यांसोबत स्वतः शिक्षणाधिकारी यांनी अनुभवली तो क्षण विद्यार्थ्यासह शिक्षकांना आनंद,उत्साह वाढविणारा ठरला.

गट्टा केंद्रातील जारावंडी येथील डिजिटल शाळेला भेटी देऊन त्यांनी वर्गात स्वतः पाठ घेतला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकांचे पाठ निरीक्षण, शालेय पोषण आहाराची पाहणी, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, पूर्व चाचणीचे पेपर्स, शालेय मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आदी उपक्रमांची पाहणी केली. शिक्षकांना अध्ययन, अध्यापनाबाबत मार्गदर्शन केले.

शाळेला गावाचा‎ आधार आणि गावाला शाळेचा‎ अभिमान या उक्तीप्रमाणे जारावंडी शाळेतील सगळ्या भौतिक सह इतर सुविधा बघून या उक्तीची अनुभूती शिक्षणाधिकारी यांना झाली. शैक्षणिक वातावरण बघून शाळेचे मुख्याध्यापक मंतय्या बेडके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

या भेटीदरम्यान शिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांनी शाळेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. शाळेच्या गुणवत्तावाढीच्या उपाययोजनांसंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित शिक्षण समिती पदाधिकारी, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याशी शाळा बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणात कसे सामावून घेता येईल याबाबत चर्चा करून पोषण आहाराची गुणवत्ता व शाळेसंबंधीत बाबींची तपासणी केली. 

यावेळी भेटीत त्यांच्या समवेत असलेले बाळकृष्ण अजमेरा (शिक्षण विस्तार अधिकारी) जिल्हा परिषद गडचिरोली, समग्र शिक्षा विभागप्रमुख संजय सातपुते, गट्टा केंद्राचे केंद्रप्रमुख मंतय्या बेडके, संबधित गावातील शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos