पातागुडम येथील इंद्रावती नदीतुन नागरिकांचा धोकादायक प्रवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
देवेंद्र रंगू / अंकीसा  :
  जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पातागुडम जवळील इंद्रावती नदीतून नागरिकांना नावेच्या साहाय्याने ८० ते १०० रुपये  मोजून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सध्या नदीतील पाण्याचा प्रवाह तसेच पाण्याची पातळी वाढली असल्यामुळे अपघाताचा धोका बळावला असतानाही नावेच्या साहाय्याने वाहने व नागरिकांना कोंबून नेल्या जात आहे. 
राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ६३  निझामाबाद ते जगदलपुर मार्गावर इंद्रावती नदी आहे.  नदीवर पुलाचे काम  वशिष्टा नामक खाजगी कंपनी कडे होते. मागील ४ वर्षापासून काम कासवगतीने सुरू आहे . या पावसाळ्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण होईल या आशेने लोक पाहत होते. मात्र अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षामुळे  नागरिकांच्या आशेवर पाणी फेरले. इंद्रावती नदी पार करण्यासाठी एका व्यक्तीला ८० रुपये  तर दूचाकी ला १०० रुपये मोजावे  लागत आहे. अधिकाऱ्यांच्या  दुर्लक्षामुळे  सामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.   नाव चालविणारे कंत्राटदार सामान्य जनतेकडून  दुप्पट रक्कम वसूल करत आहेत. याकडे   प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी  नागरिकांनी केली आहे. 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-12


Related Photos