महत्वाच्या बातम्या

 कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


- कुणबी नोंदी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय अधिकारी व विशेष कक्षाची स्थापना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी  विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी  यांनी काल विभागीय समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक  केली आहे. तसेच जिल्हानिहाय समन्वय अधिकारी व विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  

भंडारा जिल्ह्यासाठी भूसंपादन अधिकारी आकाश अवतारे यांची समन्वय अधिकारी म्हणून स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींकडे कुणबी नोंदीचे अभिलेख अथवा पुरावे असतील त्यांनी संबंधित जिल्हा समन्वय अधिकारी यांचेकडे ते सादर करण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी  केले आहे.

मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती विहीत करण्यासाठी मा.न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा समाजातील व्यक्तींकडे असलेल्या कुणबी नोंदीचे अभिलेख जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दृकश्राव्य माध्यमाद्वारे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेवून निर्देश दिले. त्यानुसार ज्या मराठा व्यक्तींकडे कुणबी नोंदी असतील त्यांनी संबंधित जिल्हा समन्वय अधिकारी किंवा विशेष कक्षाकडे कार्यालयीन वेळेत असे अभिलेख सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos