महत्वाच्या बातम्या

 दिवाळी निमित्त भंडारा-पुणे विशेष बस सेवा सुरू : प्रवाशांनी लाभ घ्यावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : राज्य परिवहन महामंडळातर्फे भंडारा आगाराचा  दिवाळीनिमित्त प्रवाशांकरीता भंडारा ते पुणे नविन निमआराम बससेवा सुरू करण्याचा  उपक्रम राबविण्यात  येत आहे.

ही बससेवा ७ ते १० नोव्हेंबर  रोजी दुपारी १२.३० व २ वाजता भंडारा बसस्थानक येथुन सोडण्यात येईल.तर पुणे येथुन भंडाराकरीता ८ ते ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.१५ व ६.१५  वाजता बसफेरी सोडण्यात येणार आहे. या बसचे तिकीट भाडे १६२० रूपये राहणार आहे.

तसेच नागपूर येथुन पुणेकरीता दुपारी २ व ३.३० वाजता बसफेरी सोडण्यात येणार असून त्याचे तिकीट भाडे १४८५ राहणार आहे.सुरक्षीत प्रवासाकरीता जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भंडारा आगार व्यवस्थापक विरेंद्र गभणे व बसस्थानक प्रमुख रिक्की बोधनकर यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos