महत्वाच्या बातम्या

 आपापल्या गावातील विश्वकर्माची नोंदणी करून घेणे प्रत्येक जनता की पार्टी (चाबी संघटनेच्या) कार्यकर्त्याचे कर्तव्य : आ. विनोद अग्रवाल


- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी तयारीला लागा. 

- ग्राम सिंदीटोला (झिलमिली) येथे ६ कोटी ७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : ग्राम सिंदीटोला (झिलमिली) येथे ६ कोटी ७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी जनता कि पार्टी चाबी संघटनेत प्रवेश घेत जनसेवेचा संकल्प घेतला. सर्वांचे दुपट्टा टाकून आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वागत केले. दरम्यान प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी तयारीला लागा तसेच आपापल्या गावातील विश्वकर्माची नोंदणी करून घेणे प्रत्येक जनता कि पार्टी (चाबी संघटनेच्या) कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.

लोकार्पण केलेल्या कामांमध्ये  विविध भागातील सिमेंट रस्ता बांधकाम, आंगणवाडी बांधकाम, बोअरवेल, शाळा वर्ग खोली बांधकाम, कुणबी समाज भवन बांधकाम, चावडी बांधकाम, शाला कंपाउंड वाल बांधकाम, शाळा स्वच्छता गृह बांधकाम, शाळा सौंदर्यीकरण, बौद्ध विहार परिसर सौंदर्यीकरण, पानी टंकी बांधकाम, बाबासाहेब आंबेडकर समाज भवन दुरुस्ती कार्याचा समावेश असून भूमिपूजन केलेल्या कार्यामध्ये कोचेवाही- चिरामणटोला- छिपिया रस्ता मजबुतीकरण, विविध रस्ता बांधकाम, बौद्ध विहार सौंदर्यीकरण, पांदन रस्ता बांधकामाचा समावेश आहे.

यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, सरपंच ओमकार बाहेकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव उके, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, चैताली नागपुरे, जिल्हा परिषद सदस्य अनंदा वाढीवा, वैशाली पंधरे, दीपा चंद्रिकापुरे, ममता वाळवे, पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम उईके, जिल्हा महामंत्री लखन हरीनखेडे, उपाध्यक्ष पृथ्वीराज नागपुरे, सुजित येवले, फिरोजजी बनसोड, सुर्यमनी रामटेके, परसराम हुमे, धनेशरावते, मुरलीधर येळे, गौतम श्यामकुवर, श्यामलालजी बागडे, सुनील राऊत, रुपलाल तावाडे, सुलोचना मेंढे, जयश्री पटले, ममता नागवंशी, धर्मशीला टेकाम, लक्ष्मीबाई पंधरे, टीटूलाल लिल्हारे, चेतन बाहेकर, कमलेश सोनवाने, प्रभाकर ढोमणे, रामराज खरे, दिलीप मुन्डेले, जितेश टेंभरे, धनंजय तुरकर, ओमेश्वर चौधरी, राधाकिशन ठाकूर, मुरली नागपुरे, श्यामकला पाचे, कौशल तुरकर व जनता कि पार्टी चाबी संघटनेचे कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos