महत्वाच्या बातम्या

 शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : जिल्हयातील विकासकामांची प्रक्रीया राबवितांना सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी सर्व यंत्रणांना दिले. नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खासदार सुनील मेंढे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी व उपवनसंरक्षक पवन जेफ तसेच प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास निरज मोरे उपस्थित होते.

जनसुविधे अंतर्गत स्मशानभुमी शेड तसेच रस्त्यांची कामे प्राधान्याने घ्यावीत. तसेच पशुसंवर्धन विभागाने लंपी आजाराच्या पार्श्वभुमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे ही निर्देश त्यांनी यावेळी दिले. पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. वंजारी यांनी विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र या तलावातुन मत्सयसंवर्धन तसेच उत्तम दर्जाचे मत्सउत्पादन केले पाहीजे. यासाठी  या विभागाने केलेल्या प्रयत्नांची त्यांनी सविस्तर माहिती जाणुन घेतली.

स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करत असलेल्या विदयार्थ्याना योग्य ते अभ्यासु वातावरण निर्मितीसाठी जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने अभ्यासीकेत विदयार्थ्याच्या संदर्भासाठी अदयावत पुस्तके ठेवण्याची सूचना त्यांनी  केली. वनविभागातर्फे नवेगाव नागझिरा अभयारण्यात आढळणारी प्राणी व पक्षी वैभव पाहण्यासाठी पर्यटक येतात. पर्यटकांसाठी वनविभाग करत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती उपवनसंरक्षक पवन जेफ यांनी त्यांना दिली.

आरोग्य विभागाने प्रस्तावित केलेल्या निधी मागणी व कामांबाबत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.टेली मेडीसीन व ई-संजीवनी बददल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हयातील विकास कामे करतांना श्वाश्त व दर्जेदार कामे अपेक्षीत आहेत.तसेच जिल्हा नियोजन समितीव्दारे होणाऱ्या कामाची गुणवत्ता ही उच्च दर्जाची असली पाहीजे. निधी मागणी केल्यानंतर त्या निधीचे उपयोजन हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार झाले पाहिजे, असे गावीत यांनी यंत्रणांना सांगीतले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर यांनी नियोजन समितीच्या कामकाजाचे सादरीकरण केले. सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी समाजकल्याणच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री गावीत यांच्याकडे मांडला. आदिवासी विकास विभागाच्या योजनांची प्रसीध्दी प्रचार करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाचे सादरीकरण ही यावेळी करण्यात आले. बैठकीनंतर गावीत यांनी माध्यमांशी संवाद साधला.





  Print






News - Bhandara




Related Photos