महत्वाच्या बातम्या

 आदिवासी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन सादर केलेले प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी पडताळणी करुन निकाली काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. अशा विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांनी प्रलंबित असलेल्या अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तात्काळ निकाली काढून विभागाच्या लाँगीनवर पाठवावे. तसेच अर्जात त्रुटी आढळून आल्यास विद्यार्थ्यांच्या लाँगीनवर परत पाठवावे. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहणार नाही तसेच महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

जिल्ह्यातील सन २०२०-२०२१ मध्ये ८८, सन २०२१-२२ मध्ये ९१ व सन २०२२-२३ मध्ये २२३ अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos