महत्वाच्या बातम्या

 चंद्रयान ३ नंतर निळ्या रंगाच्या विक्रम-१ ची चर्चा : जानेवारीत होऊ शकते लाँच


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता विक्रम-१ ची जोरदार चर्चा सुरू आहे. विक्रम-१ निळ्या रंगाचा आहे. स्पेसटेक स्टार्टअप स्कायरुट एअरोस्पेस याचे पुढच्या वर्षीच्या सुरुवातील लाँचींग करण्यासाठी तयारी करत आहे.

या कंपनीने गेल्या वर्षी भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट विक्रम-एस लाँच केले होते. रॉकेटला सबऑर्बिटल स्पेसमध्ये पाठवून त्यांनी इतिहास रचला.

हैदराबाद येथील स्कायरुट या कंपनीने मंगळवारी सात मजली मल्टी-स्टेट लाँच वाहन विक्रम-१ चे अनावरण केले. याची पेलोड क्षमता ३०० किलोग्रॅम आहे. पृथ्वीच्या कमी कक्षेत उपग्रह ठेवण्याची त्याची क्षमता आहे.

या संदर्भात स्कायरूटचे सह-संस्थापक आणि सीईओ पवन कुमार चंदना यांनी माहिती देली. ते म्हणाले की, विक्रम-१ हे सर्व कार्बन फायबर बॉडी असलेले भारतातील पहिले रॉकेट आहे. हे ३D-प्रिंटेड लिक्विड इंजिनसह सुसज्ज आहे. मात्र, पहिले विक्रम-१ मिशन अंशतः व्यावसायिक असेल. स्कायरूट पूर्णपणे व्यावसायिक होण्याआधी आणि महसूल मिळवण्यास सुरुवात करण्यापूर्वी सुमारे ३-४ विक्रम-१ मोहिमे पुढील दीड वर्षांत वाढवली जातील.

२०१८ मध्ये इस्रोच्या दोन माजी शास्त्रज्ञांनी स्थापन केलेल्या स्कायरूटने आतापर्यंत ५२६ कोटी रुपये उभे केले आहेत. लवकरच ब्रिजिंग फेरी वाढवण्याचे नियोजन आहे.

विक्रम-१ मध्ये काय आहे?
विक्रम-१ हे सात मजली रॉकेट आहे.
अनेक उपग्रह कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे.
कमी पृथ्वीच्या कक्षेत ३०० किलो पेलोड वितरीत करण्याची क्षमता आहे.
हे कार्बन-फायबर संरचना असलेले रॉकेट आहे.
विक्रम-एस रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतरचे हे दुसरे रॉकेट आहे.
त्याची पेलोड क्षमता, आर्किटेक्चर आणि लवचिकता आश्चर्यकारक आहे.





  Print






News - World




Related Photos