महत्वाच्या बातम्या

 माजी उपसभापती सौ. सोनालीताई कंकडालवार यांनी पुसूकपल्ली येथील बतकम्मा उत्सवाला दिली भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात सुद्धा या उत्सवाला अनन्य महत्व आहे. नुकतेच अहेरी तालुक्यातील नागेपली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पुसूकपल्ली येथे पंचायत समिती अहेरीच्या माजी उपसभापती सौ. सोनाली कंकडालवार यांनी भेट देऊन बतकम्मा कार्यक्रमात सहभाग घेऊन बातकम्मा उत्सव साजरा करून महिलांशी विविध विषयानुसार चर्चा केली.

तेलुगु भाषिक राज्यात बतकम्मा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील गावातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नवरात्र उत्सव काळात बतकम्मा उत्सव हि साजरा करण्यात येतो. अशातचा पंचायत समिती अहेरीच्या माजी उपसभापती सौ. सोनाली कंकडालवार यांनी पुसूकपल्ली येथील बतकम्मा उत्सावाला भेट देवून महिलांशी विविध विषयांवर चर्चा केली.

यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष रोजा करपेत, नगरसेविका सौ. सुरेखा गोडसेलवार, ग्राम पंचायत सदस्य राकेश कूड़मेथ, विनोद रामटेके,आदि उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos