महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१७ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८३१ : मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

१८८८ : थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

१९१७ : पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

१९३१ : माफिया डॉन अल कपोन यांना आयकर बुडवल्याबद्दल शिक्षा झाली.

१९३३ : अल्बर्ट आइनस्टाइ हे नाझी जर्मनीतुन पळून अमेरिकेत आले.

१९३४ : प्रभात चा अमृतमंथन हा चित्रपट पुण्याच्या प्रभात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९४३ : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक हा रेल्वेमार्ग पूर्ण झाला.

१९५६ : पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.

१९६६ : बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७९ : मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.

१९९४ : पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.

१९९६ : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

१९९८ : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

१७ ऑक्टोबर जन्म

१८१७ : भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १८९८)

१८६९ : भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

१८९२ : कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

१९१७ : वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोर यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४)

१९३० : अटकिन्स आहार चे निर्माते रॉबर्ट अटकिन्स यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००३)

१९४७ : चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.

१९५५ : अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९८६ – मुंबई)

१९६५ : श्रीलंकेचे क्रिकेटपटू अरविंद डिसिल्व्हा यांचा जन्म.

१९७० : भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.

१७ ऑक्टोबर मृत्यू

१७७२ : अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.

१८८२ : इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८१४)

१८८७ : जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८२४)

१९०६ : जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

१९८१ : भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२७)

१९९३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)

२००८ : ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १९२६)

२००८ : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)





  Print






News - todayspecialdays




Related Photos