महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


१५ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

१८४६ : अमेरिकन डॉक्टर डॉ. जॉन वॉरेन यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

१८७८ : एडिसन इलेक्ट्रिक लाईट कंपनीचे काम सुरू झाले.

१८८८ : गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.

१९१७ : पहिले महायुद्ध – जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.

१९३२ : टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

१९६८ : हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

१९७३ : हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९७५ : बांगलादेशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली.

१९८४ : आर्च बिशप डेसमंड टुटू यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९३ : अफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. क्लर्क यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर.

१९९७ : भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा बुकर पुरस्कार मिळाला.

१९९९ : जागतिक फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना प्रदान.

१५ ऑक्टोबर जन्म

१५४२ : तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबर यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १६०५)

१६०८ : इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचे (barometer) संशोधक इव्हानजेलिस्टा टॉरिसेली यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १६४७)

१८४१ : जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म.

१८८१ : इंग्लिश लेखक पी. जी. वूडहाऊस यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८९६ : स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.

१९०८ : कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जे. के. गालब्रेथ यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल २००६)

१९२० : अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९९९)

१९२६ : कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१०)

१९३१ : वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)

१९३४ : कर्नाटिक शैलीचे बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्म.

१९४६ : भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक व्हिक्टर बॅनर्जी यांचा जन्म.

१९४९ : पत्रकार, एन. डी. टी. व्ही. चे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्म.

१९५५ : भारतीय फील्ड हॉकी खेळाडू कुलबुर भौर यांचा जन्म.

१९५७ : भारतीय वंशाच्या अमेरिकन चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शिका मीरा नायर यांचा जन्म.

१९६९ : मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांचा जन्म.

१५ ऑक्टोबर मृत्यू

१७८९ : उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.

१७९३ : फ्रेंच राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांची विधवा पत्नी मेरी अँटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

१९१७ : पहिल्या महायुद्धात गाजलेली डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर माता हारी यांचे निधन. (जन्म: ७ ऑगस्ट १८७६)

१९१८ : भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचे निधन.

१९३० : डाऊ केमिकल कंपनी चे संस्थापक हर्बर्ट डाऊ यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८६६)

१९४४ : ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

१९४६ : जर्मन नाझी हर्मन गोअरिंग यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९३)

१९६१ : हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १८९६)

१९८१ : इस्रायली सेना प्रमुख व परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री मोशे दायान यांचे निधन.

१९९७ : मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

२००२ : प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.

२००२ : लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९२३)

२०१२ : कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९२२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos