महत्वाच्या बातम्या

 दिव्यांगांसाठी च्या योजना प्रभावीपणे राबवा : बच्चू कडू यांनी घेतला आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : दिव्यांग व्यक्तीविषयी सदभावना व सहानुभुती ठेवून शासकीय चौकटीतून बाहेर पडून अधिकाऱ्यांनी  दिव्यांगांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी  आज दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

यावेळी व्यासपिठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी उपस्थित होते. यावेळी समाजकल्याण तसेच आरोग्यविभागाने पुढाकार घेऊन दिव्यांग प्रमाणपत्राचे काम जलदगतीने करावे, असे कडू यांनी निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजना व कृषी विभागाने दिव्यांग नागरिक व शेतकऱ्यांपर्यत पोहोचून त्यांना लाभ दयावा. स्थानिक रोजगार क्षेत्रात नगरपालीकेने दिव्यांगांना रोजगार उपलब्ध् होईल असे पाहावे तसेच मुक बधिरांच्या अडचणी समजून घेण्यासाठी साईन लॅग्वेज तज्ञाची नेमणुक करावी असेही कडू यांनी निर्देश दिले. पुढील दोन महीन्यांनी पुन्हा या योजनांच्या कामाचा आढावा  घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आजच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबददल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.





  Print






News - Bhandara




Related Photos