महत्वाच्या बातम्या

 नवरात्र उत्सवात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी तीन दिवस निश्चित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम २०१७ अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० च्या नियम ५(३) नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-२०२३ मधील १० सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी ५ दिवस राखीव ठेवण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेल्या १० दिवसांपैकी अष्टमी २२ ते २३ ऑक्टोबर २०२३ हे २ दिवस नवरात्र उत्सवाकरीता निश्चित करण्यात आले आहे.

तसेच, आमदार किशोर जोरगेवार यांनी नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सवाकरीता पंचमी, षष्टी व सप्तमी १९ ते २१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजविण्यास सवलत मिळण्याकरीता विंनती केली आहे. त्याअनुषंगाने, नवरात्र उत्सवादरम्यान माता महाकाली महोत्सवाकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी, राखीव ठेवण्यात आलेल्या ५ दिवसापैकी १ दिवस १९ ऑक्टोबर रोजी पंचमी निमित्य सवलतीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात येत आहे.

निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos