इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया मध्ये भूकंपाचा धक्का


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / जकार्ता :
इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही देश सोमवारी सकाळी भूकंपाच्या धक्क्याने हादरले. इंडोनेशियामधील तिमोर येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता ७. ३  रिश्टर स्केल एवढी होती. तर ऑस्ट्रेलियातील भूकंपाची तीव्रता ७. २  एवढी होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पाहता या दोन्ही देशांना त्सुनामीचा धोका नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
इंडोनेशियात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू बांदा समुद्राच्या तळाशी २१४ फूट खोल होता. तर ऑस्ट्रेलियातील डार्विन शहराला बसलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सुमद्राच्या तळाशी २२० फूट खोल होता. रॉयटर्सने याबद्दल वृत्त दिले आहे. त्यानुसार इंडोनेशियात भूकंपाचा धक्का बसताच घाबरून अनेक नागरिक इमारतीमधून बाहेर आले व रस्त्यावर सैरावैरा धावू लागले. तर ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे भूकंपाचा हादरा बसताच ७०० नागरिक घर सोडून रस्त्यावर जमा झाले. तर अनेकांनी शहर सोडून जाण्यास सुरूवात केल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे.  Print


News - World | Posted : 2019-06-24


Related Photos