दीड हजारांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदारावर कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया
: घटनेची पंचनामा प्रत देण्यासाठी दीड हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
रमेश श्रीराम बिसेन असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार हे शेतकरी असुन त्यांचेकडे स्वतःच्या मालकीची क्वालीस चार चाकी वाहन आहे. तक्रारदार हे आवश्यकतेनुसार  चारचाकी वाहन भाड्याने देत असतात २४ एप्रिल रोजी  तक्रारदार हे आपले चारचाकी वाहन लग्न वरातीसाठी भाड्याने घेवुन  पठाणटोला, ता. सालेकसा येथे स्वतः गेले होते. त्याठिकाणी काही अज्ञात व्यक्तींच्या भांडणामध्ये तक्रारदाराचे वाहन व त्यांच्या सोबतच्या इतर ४ - ५ वाहनांची तोडफोड झाली असता, त्यावरुन पोलीस ठाणे सालेकसा येथे अज्ञात आरोपीविरूध्द अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेमकरीता एन.सी.आर. प्रत व घटनास्थळ पंचानाम्याची आवयश्यकता असल्याने त्याकरीता ते  सालेकसा पोलिस ठाण्यातील जमादार बिसेन यांना भेटले. यावेळी  बिसेन यांनी तक्रारदार यांना एन.सी.आर. प्रत व घटनास्थळ पंचानामा प्रत देण्याकरीता  दोन हजारांची लाच मागितली.  बिसेन  यांना   लाच रक्कम देण्याची  इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोदिया येथे तक्रार नोंदविली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून १४ जून रोजी   पडताळणी कार्यवाही दरम्यान  हवालदार बिसेन  यांनी लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती  १ हजार ५०० रूपये लाचरक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती . आज १७ जून रोजी प्रत्यक्ष सापळा कार्यवाही दरम्यान  हवालदार बिसेन  लाचरक्कम स्वीकारली. यामुळे  सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-06-17


Related Photos