महत्वाच्या बातम्या

 पोषणयुक्त घटकमिश्रित तांदुळाचे रास्तभाव दुकानांमधून वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम - २०१३ अन्वये प्राधान्य गट कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानामार्फत वितरीत होत असलेल्या तांदुळामध्ये पोषणयुक्त घटकाचे मिश्रण करून एप्रिल २०२३ पासून राज्यात फोर्टीफाईड तांदुळाचे वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या निर्देशानुसार कार्यवाही सुरू आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या तांदुळामध्ये फोर्टीफाईड तांदुळाचे मिश्रण करून पोषणयुक्त तांदुळ लाभार्थ्यांना सर्व रास्तभाव दुकानांमधून वितरीत केल्या जात आहे.

नागपूर जिल्हयामध्ये माहे मे, २०२३ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पोषणयुक्त फोर्टीफाईड तांदुळाचे वितरण सर्व रास्तभाव दुकानामधुन सुरू करण्यात आले आहे. वितरणाकरीता उपलब्ध असलेल्या १ क्विंटल तांदुळामध्ये १ किलोग्रॅम FRK (Fortified rice kernels) मिश्रण करून फोर्टीफाईड तांदुळ तयार केला जातो. त्यामध्ये व्हीटॅमिन बी १२, आयर्न व फॉलिक अॅसिड हे पोषणयुक्त घटक असतात. या पोषणयुक्त फोर्टीफाईड तांदुळ लहान मुल, गरोदर माता तसेच इतरांना सुध्दा उपयुक्त आहे. मिश्रित केलेले एफआरके घटक हे इतर तांदुळाच्या तुलनेमध्ये वजनाने हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतांना दिसतात. मात्र, गृहीणींनी स्वयंपाक करताना पाण्यावर तरंगत असलेले तांदुळाचे दाणे बाहेर न टाकता पोषणयुक्त तांदुळासह उपयोगात आणण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात आले आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos