अपघातग्रस्त एएन-३२ विमानातील १३ मृतदेह व ब्लॅक बॉक्स सापडले


वृत्तसंस्था / इटानगर  : भारतीय हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमान एएन-३२  विमानातील सर्व १३ मृतदेह अरुणाचलच्या सियांग जिल्ह्यात  सापडले आहेत. मृतकाच्या  कुटुंबीयांना त्याची माहिती देण्यात आली आहे. हे मृतदेह हेलिकॉप्टरमधून आणण्यात येतील. अपघातग्रस्त विमान एएन-३२ तील ब्लॅक बॉक्सही दुर्घटनास्थळी सापडला आहे. 
तत्पूर्वी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष मिळाल्याच्या ठिकाणी आज सकाळी १५ सदस्यीय बचाव पथक दाखल झाले होते. त्यांना हेलिड्रॉप करण्यात आलं होतं. या पथकात हवाई दल, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहक यांचा समावेश होता. या दुर्घटनेतील १३ मृतांमध्ये ६ अधिकारी तर ७ एअरमन होते.  मृतकांमध्ये विंग कमांडर जी.एम. चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के. के. मिश्रा. सार्जंट अनुप कुमार, कॉर्पोरल शेरिन, लीड एअरक्राफ्टमन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्टमन पंकज, बिगर सैनिकी कर्मचारी पुतली आणि राजेश कुमार यांचा समावेश आहे. 

   Print


News - World | Posted : 2019-06-13


Related Photos