आरोग्य विभागातर्फे हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीमेस प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली :
पावसाळा सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागात हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण जून महिन्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.ज्यासाळी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती मोहीमेला सुरुवात केली आहे. 
 जुन मध्ये दरवर्षी हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येते. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्रामीण भागात घ्यावयाची काळजी याबाबत सुचना केल्या जातात. जिल्हयामध्ये पावसाळयाच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांत तीन महिने औषध पुरेल, एवढा औषधीसाठा ठेवण्यात येते. या साठयाचे वितरण आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी विनामुल्य वितरण करत असतात.
 सन २०१७ मध्ये  ५ हजार ४८४ हिवताप रुग्ण आढळून आले होते व ५  रुग्णांचा मृत्यू झाला होता. हिवतापाकरीता अतिसंवेदनशिल भागात मोठया प्रमाणात जनजागृती केल्यामूळे सन २०१७ च्या तुलनेत २०१८  मध्ये केवळ २ हजार ५८४ हिवतापाचे रुग्ण आढळून आलेले आहेत, व ३ रुग्णांचा मृत्यू  झाला. डासामुळे हिवताप , डेंग्यू, चिकुनगुनिया , हत्तीरोगासारखे रोग पसरतात. किटकजन्य आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. ॲनाफिलीस डास हिवतापाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती स्वच्छ पाणी साठयामध्ये तर एडीज डास हा डेंग्यू, चिकुनगुनिया या आजाराचा प्रसार करतो.त्याची उत्पत्ती पाण्यामध्ये होते. पाणाच्या टाक्या, हौद, रांजण, माठ , फटके डबे पावसाचे साचलेले पाणी, घरातील कुलरमधील पाणी यामध्ये डासाची उत्पत्ती होते, त्यामुळे कुलरचे पाणी आठवडयातून एकदा बदलविण्याच्या सुचना देण्यात येतात. तसेच मच्दरदाणीचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात येत आहे. या जिल्हयातील १२ तालुक्यात जनजागृती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी ,डॉ. कुणाल मोडक यांनी दिली.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-13


Related Photos