महत्वाच्या बातम्या

 सावली : विस्तार अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली येथील पंचायत समिती चे विस्तार अधिकारी (शिक्षण), अतिरिक्त कार्यभार गटशिक्षणाधिकारी, लोकनाथ जैराम खंडारे यांना लाच स्वीकारताना २७ सप्टेंबर रोजी सावली येथे अटक करण्यात आले.

तक्रारदार हे मुल येथील रहीवासी असून ते प्राथ. शिक्षक या पदावर कार्यरत असुन त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते सहा महिने वैद्यकीय रजेवर  होते. तक्रारदार यांचे सहा महिन्याच्या वैद्यकीय रजा मंजूर नसल्याने त्यांचे सदर कालावधीदरम्यान वेतन त्यांना अदा करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी सदर कालावधीमधील त्यांचे वैद्यकीय रजा मंजूरी करीता रितसर पंचायत समिती सावली येथे अर्ज सुध्दा केले. सदर रजा मंजूर करण्याकरीता विस्तार अधिकारी (शिक्षण) यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान लोकनाथ जैराम खंडारे, विस्तार अधिकारी (शिक्षण), अतिरिक्त कार्यभार गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सावली जि. चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती ८ हजार /-रु. लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून २७ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकनाथ जैराम खंडारे यांनी

तक्रारदाराकडून ८ हजार /-रु. लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून २७ सप्टेंबर रोजी पो.स्टे. सावली, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कार्यवाही  राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. रोशन चांदेकर, नरेशकुमार नन्नावरे, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos