राज्यातील केवळ २० विद्यार्थी १०० टक्के गुणांचे मानकरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  आज ८ जून रोजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात राज्यातील केवळ २० विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.   २५ हजार ९४१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
राज्यभरातून यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण १६ लाख ३९ हजार ८६२ विद्यार्थी बसले होते. त्यातील १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  मागच्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी घसरला आहे. नवीन अभ्यासक्रम असल्याने कमी निकाल लागला असावा असा अंदाज मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी व्यक्त केला. २००७ साली राज्यात दहावीचा सर्वात कमी ७८ टक्के निकाल होता.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-08


Related Photos