जांभुळखेडा - लेंढारी भूसुरुंग स्फोटाच्या घटनेची दंडाधिकारीय चौकशी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : 
 कुरखेडा  पोलीस ठाण्याअंतर्गत  जांभुळखेडा - लेंढारी  दरम्यान १ मे  रोजी नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोटाद्वारे  पोलीसांचे वाहन  उडवून दिले. या  दुर्घटनेत १५  पोलीस जवान शहीद झाले व   वाहन चालकाचा  मृत्यू झाला . घटनेतील शहीद  जवानांचे तसेच चालकाच्या  मृत्यूच्या  कारणांचा तपास करण्यासाठी    जिल्हादंडाधिकारी   यांनी फौजदारी दंड संहिता १९७३  चे कलम १७६  अन्वये  चौकशी  करण्यासाठी उप विभागीय दंडाधिकारी , कुरखेडा यांची नियुक्ती केली  आहे. 
  घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी , प्रत्यक्षदर्शी असल्यास त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदन   १५  जून   पर्यंत या कार्यालयास समक्ष सादर करावे किंवा कोणालाही याची माहिती असल्यास उप विभागीय दंडाधिकारी , कुरखेडा यांच्या  समक्ष शपथेवर निवेदन  १५  जून   पर्यंत सादर करावे असे आवाहन उप विभागीय दंडाधिकारी कुरखेडा यांनी केले  आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-07


Related Photos