महत्वाच्या बातम्या

 सिरकाड़ा येथे विज पडून १ महिला ठार तर १ महिला जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यात सध्या धानाचा हंगाम असून पिकाचे उत्पन्न घेणे सुरु आहे. धानपिकाचे काम करण्यासाठी पुरुष व महिला मजूर वर्ग  शेत-शिवारात काम करण्यास जात असतात.

नवरगांव येथून १० किलोमीटर वर असलेल्या सिरकाडा येथील महिला मजूर प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडास सहित पाऊस आल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाले असता वीज पडून महानंदा मोतीराम अलोणे रा. सिरकाडा या जागीच ठार झाल्या. त्यांचे अंदाजे वय (६४) वर्ष असल्याचे समजते तर रोषणा प्रफुल गेडाम रा. सिरकाडा वय अंदाजे (३५) वर्ष या जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करण्यात आले. ही घटना २० सप्टेंबर २३ ला ठीक १ वाजेच्या दरम्यान घडली.

तत्पूर्वी या घटनेची माहिती  पोलीस प्रशासन सिंदेवाही ला कळवले असते बिट अमलदार बावणे तसेच नागदेवते उपस्थित झाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos