नदीत बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  वरोरा : 
स्थानिक मालविय वार्ड येथील  रहिवासी ज्ञानेश्वर कवडू आत्राम (१९) हा आपल्या काही मित्रासोबत तुलाना येथील वर्धा नदीवर पोहायला गेला असता नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवार २ जून रोजी  दुपारी दोनच्या सुमारास घडली. एकुलत्या एका  मुलाच्या अकाली  मृत्यू ने  परिवारावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 प्राप्त  माहितीनुसार ज्ञानेश्वर कवडू आत्राम हा युवक रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या काही मित्रांसोबत तुलाना येथील वर्धा नदी कडे गेला. नदीत पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे  ते सर्व मित्र नदीच्या पाण्यात शिरले.  परंतु नदीच्या पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने ज्ञानेश्वर हा पाण्यात बुडू लागला. ते पाहून मित्र घाबरले.मित्राला वाचवायचे असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बाकी मित्रांना सुद्धा त्याला वाचविण्याचा प्रयत्न असफल ठरले  आणि ज्ञानेश्वर पाण्यात बुडत गेला व दिसेनासा झाला.  या घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस तिथे पोहोचले. परंतु  शोधूनही ज्ञानेश्वर सापडला नाही. अंधार झाल्याने  पोलिसांनी शोध कार्य थांबविले. दुसऱ्या दिवशी आज ३ जून रोजी सकाळच्या सुमारास नदीत त्याचे प्रेत तरंगताना दिसले.    नदीतून त्याचे प्रेत बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनात पाठविण्यात आले. तदनंतर  मालवीय वार्डातील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले .विशेष म्हणजे ज्ञानेश्वर चे वडील काही वर्षांपूर्वी मरण पावले असून त्याची आई  मोलमजुरीचे काम करते ज्ञानेश्वर सुद्धा मजुरीचे काम करून  उदरनिर्वाह चालविन्यास हातभार लावीत होता. एकुलता एक मुलगा पाण्यात बुडून मरण पावल्याने आई शोकमग्न झाली असून या अकस्मात घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . घटनेचा अधिक तपास वरोरा पोलिस करीत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-06-03


Related Photos