महत्वाच्या बातम्या

 देवळी येथे बैल पोळा साजरा : मोठया संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती


- पोळयातील उत्कृष्ट बैल जोडीला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत.

- प्रथम पुरस्कार रुपराव उगेमुगे यांना सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा च्या वतीने स्मृतिचिन्ह व रोख रक्कम.

- द्वितीय पुरस्कार अशोकराव मरघडे यांना खासदार रामदास तडस खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह व रोख.

- तृतीय पुरस्कार सागर रघाटाटे यांना महालक्ष्मी बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह व रोख.

- चतुर्थ पुरस्कार गजानन शेंडे यांना देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे मार्फत स्मृतिचिन्ह व रोख.

- पाचवे पुरस्कार अशोक सुरकार यांना शोभा रामदास तडस यांचे वतीने स्मृतिचिन्ह व रोख देण्यात आले. 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा. ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झाला. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, या सणाच्या निमित्याने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही. आजही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष शोभा रामदास तडस यांनी कार्यक्रमात केले.

देवळी शहरात मिरणनाथ मंदीर पंटागणात एकच बैल पोळा भरविण्याची परंपरा आजही कायम आहे. बैलांचा उत्कृष्ट बांधा, रंग, तसेच सजावटीच्या आधारे या पाच बैलजोडींची गुणानुक्रमे निवड करण्यात आली. या बैल पोळ्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक बैल जोडी मालकास खासदार रामदास तडस यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले.

यावेळी बैल सजावट कमिटीच्या वतीने पाच बैल जोड्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली. ख्उत्कृष्ट बैल जोडी सजावट स्पर्धेत ५ बक्षीस देण्यात आली यामध्ये प्रथम पुरस्कार रुपराव उगेमुगे यांना सार्वजनिक बजरंग व्यायाम शाळा च्या वतीने स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देण्यात आले द्वितीय पुरस्कार अशोकराव मरघडे यांना खासदार रामदास तडस खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळी यांचे वतीने स्मृतिचिन्ह व रोख देण्यात आले, तृतीय पुरस्कार सागर रघाटाटे यांना महालक्ष्मी बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह व रोख देण्यात आले, चतुर्थ पुरस्कार गजानन शेंडे यांना देवळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थे मार्फत स्मृतिचिन्ह व रोख देण्यात आले, पाचवे पुरस्कार अशोक सुरकार शोभा रामदास तडस यांचे वतीने स्मृतिचिन्ह व रोख देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला अध्यक्ष शोभा रामदास तडस, प्रमुख पाहुणे देवळीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष शरदराव आदमणे देवळी, माजी नगराध्यक्ष नरेंद्र मदनकर, भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र कारोटकर यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाला नंदू वैद्य विजय गोमासे मारोतराव मरघडे, सारिका लाकडे, शुभांगी कुर्जेकर, अशोक कारोटकर, दिलीप कारोटकर, प्रकाश कारोटकर, श्याम घोडे, किसना उगेमुगे, संतोष मरघडे, रमेशराव सातपुते, संजय मुजबैले राजू झिलपे, राम खोंड, सुरज कानेटकर, अंकित टेकाडे, संदीप पिंपळकर, उमेश कामडी नाना दूरगुडे, स्वप्नील लाकडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद आदमणे यांनी केले तर संचालन व उपस्थितांचे आभार रवी कारोटकर यांनी मानले. देवळी येथील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos