महत्वाच्या बातम्या

 १७ सप्टेंबर रोजी मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : कौशल्य विकास विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दौड स्पर्धेत वर्धा तालुक्यातील खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या १७  सप्टेंबर रोजी जन्म दिवसानिमित्त पीएम स्कील रन  मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत १६ वर्षावरील आयटीआयचे प्रशिक्षणार्थी, शिक्षक, निदेशक सहभागी होऊ शकतात. मॅराथॉन दौड स्पर्धेचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता शासकीय आयटीआय  हनुमान टेकडी येथून होणार आहे. दौड आयटीआय हुनमान टेकडी ते म्हाडा कॉलनी- धुनीवाले मठ ते परत आयटीआय पर्यंत असा 5 किमी लांबीचा असणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम पारितोषिक ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये व तृतीय १ हजार रुपये प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना त्यांच्या आई वडीलांसह सन्मानित करण्यात येणार आहे. एकुणच कौशल्याला सन्मान प्राप्त व्हावा, समृध्दी  प्राप्त व्हावी, कौशल्य, प्रशिक्षणाबाबत व्यापक जनजागृती व्हावी हा पीएम स्कील रणचा उद्देश असून दौड सर्वासाठी खुली व नि:शुल्क आहे, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos