सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या नावावर आक्षेप, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :  बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘भारत’ चित्रपटाविरोधात विपिन त्यागी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.   विपिन त्यागी यांनी  चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेतला आहे.
‘भारत हे आपल्या देशाचे नाव असून तो कोणत्याही व्यावसायिक हेतूने वापरता येऊ शकत नाही. या चित्रपटातील मुख्य भूमिकेचे नाव देखील भारत आहे. चित्रपटातील काही डायलॉगमध्ये मुख्य अभिनेत्याची देशाशी तुलना केली आहे. त्यामुळे देशभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या नावात आणि चित्रपटात केला गेलेला ‘भारत’ या शब्दाचा वापर हटवावा’, अशी मागणी विपीन त्यागी यांनी दाखल केलेल्या याचिकेतून केली आहे.  सलमान खान याचा भारत हा चित्रपट येत्या ५ जूनला ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  Print


News - World | Posted : 2019-05-31


Related Photos