महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


११ सप्टेंबर महत्वाच्या घटना

१२९७ : स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव.

१७७३ : बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.

१७९२ : होप हिरा चोरला गेला.

१८९३ : स्वामी विवेकानंद यांनी जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले गाजलेले भाषण केले.

१९०६ : म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.

१९१९ : अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले.

१९४१ : अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली.

१९४२ : आझाद हिंद सेनेने जन गण मन राष्ट्रगीत म्हणून गायले.

१९४४ : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.

१९६१ : विश्व प्रकृती निधी (World Wildlife Fund) ची स्थापना.

१९६५ : भारतीय सैन्याने लाहोर जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

१९७२ : नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

१९९७ : नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले.

२००१ : वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.

२००७ : रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

११ सप्टेंबर जन्म

१८१६ : जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म.

१८६२ : इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म.

१८८४ : भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४)

१८८५ : इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०)

१८९५ : भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२)

१९०१ : साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२)

१९११ : भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००)

१९१५ : भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७)

१९१७ : फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९)

१९३९ : ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म.

१९७६ : भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म.

१९८२ : तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म.

११ सप्टेंबर मृत्यू

१८८८ : अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन.

१९२१ : तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२)

१९४८ : पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६)

१९६४ : हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

१९७१ : सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४)

१९७३ : चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर ॲलेंदे याचं निधन.

१९७३ : भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन.

१९७८ : बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली.

१९८७ : हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०७)

१९९३ : चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन.

१९९८ : क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं. नोशीरवान दोराबजी तथा एन. डी. नगरवाला यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १९०९ – अहमदनगर, महाराष्ट्र)

२०११ : भारतीय सैनिक व पायलट अंजली गुप्ता यांचे निधन.





  Print






News - todayspecialdays




Related Photos