महत्वाच्या बातम्या

 ४ सप्टेंबर ला लोकशाही दिन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे  ४ सप्टेंबरला दुपारी १ ते २ या वेळेत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनासाठी नागरिकांकडून दुपारी १२ वाजेपर्यंत तक्रार व निवेदन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. तक्रार अर्ज दाखल केलेला नागरिकाला व्यक्तीश: लोकशाही दिनात सहभागी व्हावे लागेल.

लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्जावर कारवाई न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करावा. तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांक नमूद करणे अनिवार्य राहील. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.





  Print






News - Nagpur




Related Photos