विदर्भात पाच जागांवर भाजप तर ३ जागांवर शिवसेना आघाडीवर


- चंद्रपूरातून काॅंग्रेसचे धानोरकर आघाडीवर
- अमरावतीमधून नवनित राणा आघाडीवर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होत असून विदर्भातील लोकसभा क्षेत्रांचा विचार केल्यास पाच जागांवर भाजपा तर ३ जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. तर चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून काॅंग्रेसचे बाळू धानोरकर आणि अमरावती विधानसभा क्षेत्रातून अपक्ष उमेदवार नवनित राणा आघाडीवर आहेत.
नागपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे अशोक नेते, भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे सुनिल मेंढे, अकोला लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे संजय धोत्रे, वर्धा लोकसभा क्षेत्रातून भाजपाचे रामदास तडस, रामटेक विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे कृपाल तुमाने, बुलडाणा लोकसभा क्षेत्रातून शिवसेनेचे प्रतापराव जाधव, यवतमाळ - वाशिम लोकसभा क्षेत्रातून शिवसेनेच्या भावना गवळी आघाडीवर आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-05-23


Related Photos