महत्वाच्या बातम्या

 हिंगणघाट येथे दोन दिवस बस चालकांची आरोग्य तपासणी


-  १५७ चालकांनी घेतला तपासणीचा लाभ

-  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने जिल्हाभर ठिकठिकाणी बस चालकांसाठी नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगणघाट येथे सलग दोन दिवस शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकून १५७ बस चालकांनी शिबिराचा लाभ घेतला.

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी प्रवासी बस चालकांकरिता नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण १५७ चालकांनी नेत्र व आरोग्य तपासणी लाभ घेतला.

आरोग्य अधिकारी नेत्रतज्ञ डॉक्टर मनोज सक्तेपार, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉक्टर जीवन तांबेकर, डॉक्टर नमोदिया, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर चाचरकर यांच्या मार्गदर्शनात किशोर मेश्राम सुरेश पाटील यांनी शिबिराचे काम पाहिले.

नेत्र तपासणी करिता डॉक्टर संजय बोबडे, प्रफुल्ल काकडे यांनी काम पाहिले. सदर शिबिराच्या यशस्वीतेकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनात मोटर वाहन निरीक्षक गोपाल धुर्वे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल भगत, अमर पखान व लिपिक शेखर रामटेके, वाहन चालक घनश्याम टिक्कास यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Wardha




Related Photos